नांदेड प्रतिनिधी दि.४: आज ऑल इंडीया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ केदार यांनी अक्षय भालेराव यांच्या पिडीत कुटुंबाची भेट घेऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आरोपीला फाशी झाली पाहिजे,पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही सुद्धा झाली पाहिजे,ग्रामपंचायत बरखास्त करून आरोपींची मालमत्ता नष्ट केली पाहिजे,दोन आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करण्यात यावी,आरोपीला आमदाराने आश्रय दिल्याचे समजत आहे, त्या आमदाराला सह आरोपी करावे,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षच पद तात्काळ काढून घ्यावे,120 ब ची कार्यवाही झाली पाहिजे, 48 तासात गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी पीडितांची भेट घेतली पाहिजे,कुटुंबाला 50 लाखांची मदत, एक जणाला शासकीय नोकरी दिली पाहिजे,जातीयता सामूहिक दहशतवाद म्हणून घोषित झाला पाहीजे,तात्काळ मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांनी पीडितांना भेट द्यावी अन्यथा मंत्रालयावर धडक दिल्याशिवाय राहणार नाही. निळा जनउठाव मोर्चा काढून निळ्या वादळाचा उद्रेक दाखवल्याशिवाय राहणार नाही.समाजाचा आक्रोश ओळखून कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर सरकारने गांभीर्याने घ्यावे.अन्यथा आंदोलनाचा ऊद्रेक अटळ आहे आशी प्रतीक्रीया पञकारांशी संवाद साधताना दिली.यावेळी महाराष्ट्रध्यक्ष विनोद भोळे, जिल्हाध्यक्ष किरणभाऊ फुगारे,स्वरुपाताई भोसले व असंख्य कार्यकर्ते यावेळी ऊपस्थीत होते. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड