ग्रामस्थांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे मागणी एकंबा येथील पाणी फिल्टर मशीन, अंगणवाडीतील लहान मुलांचे साहित्य सह आदी विकास कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू…
हिमायतनगर प्रतिनिधी /- तालुक्यातील मौजे एकंबा येथील नळ योजने सह पाणी फिल्टर मशीन , पंधराव्या वित्त आयोगातून अंगणवाडीतील लहान मुलांचे साहित्य खरेदी विक्री मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत गावातील अंतर्गत नाल्या सह दलित वस्तीच्या विकास कामाचे अंदाजपत्रक तयार न करता संबंधित बांधकाम इंजिनियर व पंचायत समिती येथील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून एकंबा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक सह रोजगार सेवकाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी दि 20 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवार यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे….
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा गावातील शासकीय नळ योजनेचे कागदपत्रे तयार करून काम न करताच पैसे उचलून घेतल्याचा आरोप संबंधित सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकावर ग्रामस्थांनी एका लिखित तक्रारीद्वारे केला आहे त्यासह गावातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगा मधील विकास निधीतून अंगणवाडीत साहित्य खरेदी केल्याचे दाखवत शासनाची दिशाभूल करून पैसे उचलल्याचा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केला आहे त्याचबरोबर गावातील पाणी फिल्टर मशीन सह सार्वजनिक विहीर खोदल्याचे दाखवत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून संबंधित सरपंच व ग्रामसेवका सह रोजगार सेवकांनी शासनाच्या डोळ्यात धुळपत करत एकंबा गावामध्ये कामे न करता लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप एकंबा येथील ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात दिनांक 20 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवार यांची भेट घेऊन येथील ग्रामस्थांनी संबंधित विकास कामांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याची तात्काळ उच्च स्तरीय चौकशी करून प्रत्यक्षात वरील कामे झालीच नाहीत याबाबत गावातील पंचा समक्ष ह्याचा पंचनामा करून कागदोपत्री कामे करणाऱ्या सरपंच ,उपसरपंच व ग्रामसेवकासह संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कार्यवाही करून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी एकंबा येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाड मॅडम यांच्याकडे केली आहे अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर लवकरच अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा एकंबा येथील ग्रामस्थांनी दिला आहे ह्यावर गंगाप्रसाद कंदेवाड ,मारोती पुंजरवाड यशवंत वाघमारे ,श्रीरंग सूर्यवंशी, गणेश घुंगराळे, राजू देशपांडे ,रमेश लुमदे, परमेश्वर बोईनवाड, रवी कानिंदे सह आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
चौकट.
एकंबा गावातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या योजनेमार्फत शहरात पाणी फिल्टर मशीन न बसवताच बसवली असे दाखवून शासनासह गावातील ग्रामस्थांची फसवणूक करून अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांचा निधी परस्पर सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकांने हडप केल्याचा लेखी पुरावा सुद्धा ग्रामस्थां जवळ उपलब्ध आहे त्यामुळे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या दोषीवर 420 चा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक शासन करावे व त्यांना कायमचे पदमुक्त करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी वैभव कंदेवाड यांनी केली आहे.