तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती मोठ्या हर्ष उल्लासात संपन्न करण्यात आली. सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण व सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले .
दुसऱ्या पुष्पा मध्ये सर्व गावकरी बंधू व सर्वांना भोजनदान देण्यात आले आणि पाच वाजता शांततेच्या वातावरणामध्ये बोध धम्माच्या नियमाप्रमाणे शांततेच्या मार्गाने गावातील प्रमुख रस्त्यावरून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .
या कार्यक्रमाला सरपंच , पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, आरोग्य कर्मचारी, अशा , अंगणवाडी कर्मचारी, व सर्व समाजातील बहुजन बांधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाला मराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे साहेब , कांबळे साहेब , पोलीस जमादार श्याम वडजे साहेब व महिला पोलीस यांचा मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवण्यात आला.