हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण केले. आंदोलनाचे लोण सर्वत्र पसरले असताना शासनाने एक बैठक घेतली, मात्र धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नाही. शासनाला आठवण करून देण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर धनगर समाज बांधव धडकले. व येथील तहसीलदार डी.एन. गायकवाड, नायब तहसीलदार जी.डी. हराळे यांच्याकडे ८ मागण्यांसह धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचा अशा घोषणांनी दिल्या आहेत.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ शासनाने अंमलबजावणी करा, अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यावतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत अॅड: कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करा तसेच न्यायालयात तात्काळ दैनदिन सुनावणी करता अर्ज दाखल करा,मेंढपाळसाठी घोषित केलेल्या १० हजार कोटीच्या सरकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी तसेच स्वतंत्र अध्यक्षाचे नेमणूक करावी, जे आदिवासींना ते धनगरांना याप्रमाणे घोषित केलेल्या १ हजार कोटी रुपयांच्या २२ योजनापैकी काही योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी उपलब्ध झाला नाही. याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी अनंतराव देवकते, दत्तात्रय हंगरगे, डॉ. शिवाजी देवकते, नरसिंगराव बंडगर, हरिश ताडकुले, नारायण देवकते, बाबुराव पालवे, अनिल अंडगे, प्रा. सतीश ताडकुले, सुभाष माने, कैलास भोइके, गोविंद शेळके, दत्तरामं शेळके, किरण बिट्टेवार, संदीप भंडारे, आकाश कोरे, व्यंकट पांढरे, बालाजी मुसाळे, बालाजी हुबे, जलबा ताडकुले, सूर्यप्रकाश कोरे, प्रसाद भिगोरे, मोजराम हुबे, मारोती वारकड, सोहम शेळके, विशाल श्रीरामे, राजू पांढरे आदीसह शेकडो धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.