Tanisha Bhise Death Case Pune Deenanath Mangeshkar Hospital Controversy: पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आला. या दुस-या अहवालात डॉ. घैसास हे दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डॉ. घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय.याप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास अडचणीत सापडले. राजीनामा दिलेल्या डॉ. घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं नोटीस पाठवली. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर मंगेशकर रुग्णालयावर प्रचंड टीका झाली. डॉ. घैसास यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला.
18 एप्रिल रोजी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर केला. या अहवालात यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांना क्लीन चिट मिळालीय तर मंगेशकर रुग्णालयावरही ठपका ठेवलेला नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या अवहालानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात होते. यानंतर आता दुसरा अहवाल सादर झाला आहे.
दुसऱ्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका डॉ. घैसास यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डॉ घैसास यांच्यावर कलम १०६(१) नुसार अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. घैसास यांनी निष्काळजीपण आणि हलगर्जीपणा दाखवला वेळ घालवला त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी जे मेडिकल कॉलेज याच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्ण चौकशी करून अहवाल दिला होता त्यानुसारच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला आहे बाकी सगळ करून कायदेशीर सगळ केलं जाईल. शासन जी आर नुसार कारवाई केली जात आहे. डॉ घैसास यांचा रोल यात दिसत आहे त्यानुसार कारवाई केली आहे. डॉ घैसास यांच्यावर स्टेटमेंट घेतला जाईल,जबाब घेतला जाईल त्यावी माहिती घेतली जाईल अशी माहिती झोन 3 चे डीसीपी संभाजी कदम यांनी दिली.