तुषार कांबळे | तालुका प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा शहरात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सितार, गोवा, माणिकचद, राज निवास, विमल, रजनीगंधा, या गुटक्याची ठोक जाणि किरकोळ विक्रीचा तामसा शहरात बोलबाला सुरू असून एवढेच नाही तर तामशाचे ‘मेन’ ‘गुटखा तस्कर’ ‘आंध्रप्रदेशातून ‘भोकर हिमायतनगर, मार्गे हे गुटका गाड्यांच्या गाड्या भरून आयात करून तामसा शहरात जाणून गोपनीय ठिक ठिकाणच्या गोदामात ठेवून रात्री बेरात्री गाठ्यांच्या गाठ्या आयात करून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, बाळापुर, वारंगा अशा अनेक शहरात जाणि गावात अनेक तालुक्यात बेधडकपणे अनेक विविधचार चाकी गाडीत गुटखा भरून राजरोसपणे पाठवून ठोक विक्री करून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक यांच्या ध्येय धोरणाला हरताळ फासण्याचे काम तामसा येथील गुटखा तस्कर करीत असल्याचे तामसा शहरातील जनतेत बोलल्या जात आहेत.
शासनाने बंदी घातलेला हा गुटखा सर्वसामान्य जनतेच्या आणि शालेय विद्याथ्यांच्या आरोग्य आणि जीवणासी खेळ खेळत असून तामसा पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचरोबरच पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग गाढ झोपी गेली की काय? त्यांना सर्वसामान्य जनतेचे आणि शालेय विद्याथ्यांच्या जीविताचे काही देणे घेणे नाही की काय? असे अनेक प्रश्न येथील जनता उपस्थित करीत असून नांदेड परिक्षेत्राचे उपपोलीस महानिरीक्षक माननीय शहाजी उमाप, यांच्या अवैध धंदे विरोधी ध्येय धोरणानुसार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष नदिड जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्याचेअवैध धंदेविरोधी पथक हदगाव तालुक्यातील तामसा शहरातील आणि परिसरातील अवैध गुटखा विक्री आणि तस्करीस कायमचे लगाम का घालत नाही यातून सर्वसामान्य नागरिकाचरोबरच शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देतील जशी आशा येथील जनता करीत आहे.
#सत्यप्रभा_न्यूज #नांदेड #SatyaprabhaNews