कबड्डी सह विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्या :- के.बी. शन्नेवाड..
हिमायतनगर दि.२ : शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल बोरगडी रोड येथे दिनांक 5 ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेची सुरुवात कबड्डी या क्रीडा स्पर्धेने सुरुवात होणार आहे त्यामुळे हिमायतनगर शहरा सह तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी व शाळेंनी या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आव्हान क्रीडा संयोजक के.बी.शन्नेवाड यांनी केले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासन व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हिमायतनगर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे या स्पर्धेची सुरुवात दिनांक पाच ऑगस्ट रोजी शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूल बोरगडी रोड येथे सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे या क्रीडा स्पर्धेची सुरुवात कबड्डी या खेळाने होणार आहे त्यानंतर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये खो-खो, क्रिकेट, बुद्धिबळ, हॉलीबॉल, कुस्ती ,मैदानी, बॅडमिंटन, योगासन सह फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धा आहेत यामध्ये तालुक्यातील असंख्य जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आव्हान तालुका क्रीडा संयोजक के.बी. शन्नेवाड यांनी केली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिमायतनगरचे तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम ह्या राहणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक जाधव साहेब गटविकास अधिकारी हिमायतनगर तर प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले, रमेश सगर, मनोहर राठोड, रणखांब सर, वानखेडे सर ,कापसे सर, सूर्यवंशी सर, नवसागरे सर, शेख सर ,गवंडी सर सह आदी शाळेचे शिक्षक व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत ह्याची तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषदच्या शाळांनी नोंद घेऊन आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान तालुका क्रीडा समितीकडून करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नादेड