पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Hospital) हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. भाजप आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यकाच्या पत्नीच्या रुपाने या घटनेवर प्रकाश पडला आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून राज्यातील धर्मादाय आयुक्तांसोबत बैठक घेऊन कठोर निर्णय घेऊ, असं बनसोडेंनी म्हटलं आहे. | Pune News |
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल घडलेली जी घटना आहे ती फार दुर्दैवी आहे. पैशांच्या अभावी रूग्णाची डॉक्टरांनी काळजी न घेतल्याने, त्यांच्या निष्काळजीपणामुळं त्या महिलेचा मृत्यू झाला असं तिच्या कुटूंबाचं म्हणण आहे. मी धर्मादाय आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. काल घडलेली जी घटना आहे तशी घटना संपूर्ण महाराष्ट्रमध्ये घडू नये, आमदार गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाची ती पत्नी होती, त्यांच्या दुर्दैवी जाण्याने या गोष्टीवर प्रकाश पडला. यापूर्वी अशा घडना घडल्या असतील, मात्र, अशा घटना घडू नये यासाठी मा मुंबईत गेल्यावरती एक बैठक घेणार आहे, अशा घटना टाळण्यासाठी यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, अशी माहिती एका वृत्त वाहिणीशी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.