हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी लोकहिताचे समाजकारण व राजकारण करणारा देशातील एकमेव पक्ष आहे. विकासाचे राजकारण चालू असल्यामुळेच आज सर्व घटकातील जनतेचे भाजपाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही भेदाभेद न ठेवता विकासाचे नवे पर्व महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या नांदेड जिल्ह्यात निर्माण केले असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी हिमायतनगर येथील सवना ज येथील असंख्य युवकांच्या पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यात सवना ज येथील योगेश अंनगुलवार यांच्या सह सवना सर्कल मधील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर पाटील व तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जाहीर प्रवेश केला यावेळी बोलताना सुधाकर भोयर यांनी असे सांगितले की समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध योजना मोदी सरकार राबवत असल्यामुळे सर्वांचाच सर्वांगीण विकास चालू आहे सध्या आपल्या मतदारसंघातील अडगळीत पडलेला विकास आपण जनतेसमोर आणला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहचवली. सत्तेचा दुरुपयोग केला नाही. सातत्याने विकासाचे राजकारण करून, गोरगरीब आणि वंचितांना न्याय देण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे त्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून व गजानन चायल यांच्या नेतृत्वात आपल्याला येणाऱ्या काळात या मतदारसंघात गोरगरीब नागरिकांची कामे करायची आहे व भारतीय जनता पक्षाची ताकत वाढवायची आहे असे सांगत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी पुष्पहार घालून स्वागत करून शुभेच्छा दिल्या…
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तूप्ते वार, डॉ. प्रसाद डोंगरगावकर,संतोष आडकिणे पाटील, सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण ठाकूर, चिटणीस दुर्गेश मंडोजवार,अभिवक्ता संघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदलवाड ,दत्ता शिराणे, लक्ष्मण ढानके,हिमायतनगर शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे,शहर अध्यक्ष शीतल सेवनकर , बालाजी तोटेवाड, ओमकार सेवनकर,सोशल मीडियाचे विशाल शिंदे, गजानन पिंपळे,तानाजी सोळंके सह सवना (ज) येथील असंख्य नव निर्वाचित भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.
⬛ सोशल मीडिया जिल्हा संयोजक पदी नागेश शिंदे व युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी योगेश अंनगुलवार यांची निवड…
भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढी साठी नेहमी अग्रेसर असणारे हिमायतनगर शहरातील युवा तरुण कार्यकर्ते नागेश शिंदे यांची भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर यांनी आज दि 8 डिसेंबर रोजी सोशल मीडिया जिल्हा संयोजक पदी निवड करून त्यांना प्रशस्ती पत्र दिले व सवणा ज येथील योगेश अंनगुलवार यांची हिमायतनगर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांना प्रशस्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…..