- हिमायतनगर शहरातील सर्व बाजार पेठ दिवस भर बंद ठेऊन निषेध व्यक्त..
हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील व हदगाव तालुक्यातील दत्ता पाटील हडसनीकर यांना जाहीर पाठिंबा देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सकल मराठा समाज बांधवांनी साखळी पद्धतीचे उपोषण सुरू केले होते या उपोषणामध्ये येथील मराठा समाजाचे नव तरुण युवक सुदर्शन देवराय वय 27 वर्ष या युवकाने गळफास घेत दि 17 सप्टेंबर च्या रात्री मराठा आरक्षणाबाबत आम्हाला न्याय मिळावा अशी चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली या घटनेनंतर हिमायतनगर तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला असल्याचे पहायला मिळाले
या घटने नंतर सोमवारी दि 18 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या तरूणानी श्री परमेश्वर मंदिर कमान समोर टायर जाळून शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी एका दुकानाची तोडफोड देखील करण्यात आली होती पण पोलिसांच्या सतर्कतेने काही हानी झाली नाही या दरम्यान शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, मयताच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ 50 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करावी,मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावाव, मृतांच्या पत्नीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे, जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी मृताच्या लहान मुलाच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, तात्काळ घरकुल योजनेमध्ये मृतांच्या कुटुंबाचा समावेश करावा अशा अनेक मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार सांहेबान मार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते या निवेदनाची दखल म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वतः हिमायतनगर येथे येऊन सकल मराठा समाज बांधवांना शांततेचे आव्हान करत यातील मागण्या तात्काळ वरिष्ठांना सांगून मी पूर्ण करण्याचे आश्वासन देतो असे सांगून हिमायतनगर शहरातील पोलीस स्थानकात जमलेल्या सकल मराठा समाजाचा जमाव त्यांनी शांत केला या घटनेने सकाळी हिमायतनगर तालुक्यात तणावाचे वातावरन निर्माण झाले होते व संपूर्ण दिवस भर येथील बाजार पेठ बंद ठेवण्यात आली होती ठीक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता
या घटनेमुळे हिमायतनगर पोलिसासह नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा व महसूल प्रशासनाची सर्व टीम हिमायतनगर शहरात दाखल झाली होती यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ,पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, हदगाव येथील उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, अप्पर पोलीस अधीक्षक चिखलीकर, धरणे साहेब, यांच्या मध्यस्थीने सकल मराठा समाजाच्या बांधवांना ठिकठिकाणी सुरू असलेले आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन करण्यात आले संबंधित कामारी येथील मयत झालेल्या नवतरुण मराठा युवकावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचावर शव विच्छेदन करून त्यांचे प्रेत त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले व त्यांच्यावर शांततेत अंत्यविधी करण्यात आला यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, विधानसभेचे नेते माधव देवसरकर सह कामारी येथील सकल मराठा समाजाचे सर्व बांधव व नवतरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते