नांदेडदि.१३: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ४० टक्के शास्ती माफी योजना लागु आहे. त्यानुसार अधिकधिक मालमत्ता धारकांकडुन कर संकलन करुन वसुलीचे उद्दीष्टे १०० टक्के पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरीक्त आयुक्त गिरीष कदम यांनी दिलेले आहे. त्यानुसार उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना थकबाकीदार यांच्याकडुन कर वसुली करावी व कर भरण्यास नकार दिल्यास जप्तीची कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
आज दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी क्षेत्रीय कार्यालय वजिराबाद अंतर्गत मालमत्ता धारक नाव दिनेश ओमप्रकाश बाफना परिसर पिन क्र.४०४०४०३३८१ या मालमत्ता धारकांकडून रु.१,८८,६६०/-करापोटी मालमत्ता कराची रक्कम येणे बाकी होती. परंतु कराची भरणा असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताची मालमत्ता अटकावुन ठेवण्यात आली असुन, व मालमत्ता धारक अजायबसिंघ मोहनसिंघ गुरुद्वारा परिसर मालमत्ता क्र.३-४-११३ या मालमत्ता कर रु.१०,४८,६००/-व विषेश पाणी कर रु,१,६८,६४६/- असे एकुण रु,१२,१७,७४६/- येणे बाकी असल्यामुळे कराची भरणा असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताची मालमत्ता अटकावुन ठेवण्यात आली आहे. व त्याच मालमत्ता धारकाचे मालमत्ता क्र, ३-४-११७ या मालमत्तेवर मालमत्ता कर रु,११,६२,९१७/- व पाणी कर रु,३,५९,११३/- असे एकुण रु,१५,२२,०३०/-थकबाकी असल्याने कराची भरणा असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताची नळ व ड्रेनेज खंडीत अटकावुन ठेवण्यात आली आहे. ही कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव यांच्या नियंत्रनाखाली गौतम कवडे, अझर अली, वसुली लिपीक गणेश बुंदेले, श्रीकांत पुरस्तवार, शुभम तागडा, पाईकराव, राजुसिंग चंदेल शिपाई यांनी कार्यवाही केली.
महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेचा चालु व थकीत कर भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे व जप्तीसारखी अप्रिय घटना टाळावी, असे आवाहन उपायुक्त (महसुल) डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड