हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- सध्याच्या डिजिटल युगात सुलेखनाची कला लोप पावत आहे त्यामुळे माझी शाळा माझा फळा समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन नुकतेच घेण्यात आले आहे त्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात हिमायतनगर येथील रामराव पाटील सूर्यवंशी यांची नात तथा सुपर प्रवाह वरील सुपरस्टार फेम कु. श्रीमयी श्रीनिवास सूर्यवंशी हिला नुकतेच अक्षर संमेलनात कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिखरे सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की माझी शाळा माझा फळा समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दिनांक 24 ते 26 मे या दरम्यान नुकतेच कोल्हापूर विद्यापीठ येथे संपन्न झाले या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी येथील कुलगुरू डॉ. डी.डी शिर्के सर यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अक्षर संमेलन सोहळ्याचे उद्घाटन माननीय डॉ. व्हि.डी.शिंदे( कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुरेश पोतदार (माजी प्राचार्य कुलनिकेतन कोल्हापूर), शुभम गायकवाड, नरेंद्र महाडिक यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला या सत्कारामध्ये हिमायतनगर येथील रामराव पाटील सूर्यवंशी यांची नात तथा स्टार प्रवाह वरील सुपरस्टार फेम कुमारी श्रीमयी श्रीनिवास सूर्यवंशी या चिमुकलीने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या स्पर्धेमध्ये श्रीमयी सूर्यवंशी हीचा महाराष्ट्र राज्यांमधून प्रथम क्रमांक आल्याने हिमायतनगरच्या श्रीमयी सूर्यवंशीचा तेथील कुलगुरूंच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर सह माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ, नित्य योग परिवाराचे अक्कलवाड सर, वराडे सर, बाळासाहेब चौरे, सुभाष बलपेलवार,साहेबराव अष्टेकर, रमेश कदम सह पत्रकार परमेश्वर गोपतवाड,प्रकाश जैन, दत्ता शिरांणे,अनिल भोरे,सुभाष दारवंडे,सोपान बोंपिलवार, नागेश शिंदे,अनिल नाईक, यांच्या सह आदी जणांनी श्रीमयीचे आजोबा रामराव सूर्यवंशी यांचे अभिनंदन करून श्रीमयीस पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या….