कंत्राटी कर्मचाऱ्याने केली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
ता. प्र. दत्तात्रय सज्जन | धर्माबाद दि.२४ | धर्माबाद शहरापासून जवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे सिरजखोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील शासकिय पदावर विराजमान असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांना देशास राज्यघटना समर्पित करणाऱ्या घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यास वेळ मिळाला नसल्याचे स्पष्ट चित्र असून जबाबदार पदावर विराजमान असून सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केवळ औपचारिकता पाळण्यापुरते अभिवादन करण्यात आले.
सदरील वृत्त असे की धर्माबाद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजखोड येथील दवाखान्यात कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ,नर्स यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून यापैकी एकही वैद्यकीय अधिकारी अथवा नर्स व अन्य कर्मचारी हे आपल्या मुख्यालयी उपस्थित राहत नसल्यामुळे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यालयात साजरी केल्या गेली परंतु दुर्दैवाने प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजखोड येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असूनही सदर दिवशी आपल्या दवाखान्यात उपस्थित राहिले नसल्यामुळे येथे कार्यरत असलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यांने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून एकट्यानेच जयंती साजरी केली.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी जाणीवपूर्वक गैरहजर राहून एक प्रकारे या महामानवाचा अपमान केला आहे. व शासनाच्या आदेशाचे पालन केले नाही.याकरिता अशा बेजबाबदार मुजोर अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन मा. उपविभागीय अधिकारी साहेब, धर्माबाद यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शंकर सज्जन, संतोष शिरसे,किरण शिरसे, रवी शिरसे, हणमंत शिरसे,गणेश अवधूते नेरळीकर इत्यादीच्या स्वाक्षऱ्या होत्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड