हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथून आज दि 30 डिसेंबर रोजी अयोध्या श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र धाम येथून आलेल्या अक्षदा पूजन कलश शोभयात्रेमध्ये हजारो महिला व भजनी मंडळीने सहभाग घेऊन रस्त्यावर पुष्पवृष्टी करत सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते व वाढोना परिसर जय श्रीरामाच्या गजराने दुमदुमुन निघाला असल्याचे पहायला मिळाले…
या बाबत सविस्तर वृत्त असे की श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलश यात्रेची शोभयात्रा दिनांक 30 डिसेंबर रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथून भव्य शोभयात्रा निघाली त्या शोभयात्रेचे स्वागत मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी शोभ यात्रेच्या मार्गावर रांगोळी व सुशोभीकरण करून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत कलश यात्रेचे स्वागत केले त्या शोभ यात्रेमध्ये हजारो महिला व भजनी मंडळींनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन जय श्री रामाचा गजर करत वाढवणा नगरी दुमदुमून गेली होती या भगव्या शोभ यात्रेमध्ये टाळ मृदुंगाच्या निनादात व राम नामाच्या गजरात काढलेल्या या कलश यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे पाहायला मिळाले यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, वि हि.प.चे श्यामजी रायेवार, सुनील नावडे, गजानन तुपतेवार, गजानन चायल,विपुल दंडेवाड, विलास वानखेडे,दुर्गेश मंडोजवार, बजरंग दल तालुकाध्यक्ष सोपान कोळगिर, ज्ञानेश्वर लीगमपल्ले, शिवम गाजेवार, निक्कू ठाकूर,गजानन मांगुळकर,श्रीकांत घुंगरे, निलेश चटणे, श्री गुंडेवार, सुधाकर चिट्टेवार, शुभम नरवाडे,राहुल कारमोड, वैभव डांगे, अजय बेदरकर, परमेश्वर निमडगे, बंडू अनगुलवार,गजानन मुत्तलवाड, प्रीतम पिंपळे, देवा चर्लेवार, लक्ष्मण डांगे, गजानन हरडपकर, मंगेश धुमाळे, उषा देशपांडे, सुनंदा दासेवार, ज्योतीताई हरडपकर, संगीता साखरकर, ज्योतीताई बेदरकर, आदींसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता