हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील लकडोबा चौक हिंदू वैकुंठधाम स्मशान भूमीच्या सुशोभीकरणासह दुरुस्तीचे काम मागील एक वर्षापासून समिती करत आहे या सार्वजनिक कामासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर, व श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी सह असंख्य जणांचे मोठे योगदान लाभत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी तर्फे शहरातील हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना शंभू महादेव देवाचे दर्शन घडावे ह्यासाठी मंदिर कमिटी कडून स्मशान भूमी परिसरात महादेवाची मूर्ती आज दि 17 मे रोजी देण्यात आली ह्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना दि 20 मे रोजी शहरातील लकडोबा चौक परिसरातील हिंदू स्मशान भूमी येथे विधिवत पूजा अर्चना करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांनी यावेळी दिली शहरातील हिंदू वैकुंठधाम स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून येथील कमिटी मार्फत सुरू आहे या कमिटीच्या सदस्यांनी अथक परिश्रमातून समशान भूमी परिसरामध्ये एल.ई.डी लाईट सह सिमेंट काँक्रीट रस्ता व बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना अंत्यविधीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सह विविध विकास कामे सुरू केली आहेत या विकास कामासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर सह श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे या स्मशानभूमीच्या विकासासाठी लोकसहभागातून विविध विकासकामे सुरू आहेत यासाठी स्मशानभूमी समितीकडून दिनांक 20 मे रोजी नव्याने देण्यात आलेल्या श्री परमेश्वर मंदिर कमिटीने त्यांच्या स्वखर्चातून या परिसरात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना महादेवाचे दर्शन घडावे या उद्देशाने एक मूर्ती भेट देण्यात आली आहे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत येत्या सोमवारी दि 20 मे रोजी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याच्या आव्हान स्मशानभूमी समितीकडून करण्यात आले आहे
यावेळी महावीर सेठ श्रीश्रीमाळ, शामसुंदर ढगे ,लक्ष्मण डांगे, विलास वानखेडे, वामनराव पाटील मिराशे, श्रीकांत घुंगरे, राजदत्त सुर्यवंशी, बालाजी तोटेवाड,संजय माने,अनंता देवकत्ते, संजय माने,ज्ञानेश्वर शिंदे, गजानन हरडपकर,रामभाऊ सूर्यवंशी,गोविंद शिंदे, नागेश शिंदे,अनिल नाईक,सह आदी जन उपस्थित होते