👉🏻स्मशान भूमी परिसरात दररोज कावळा पंगत सुरू…
👉🏻 वैकुंठधाम स्मशानभूमीच्या विकासामध्ये मोठी भर….
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट दिवसेंदिवस वाढतच चाललेला असल्याचे दिसून येत आहे श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांनी नुकतेच येथील स्मशानभूमीच्या परिसरात श्री शंभू शंकर महादेवाची भव्य मूर्ती देऊन तिची प्राणप्रतिष्ठापना या स्मशान भूमी परिसरात केली व या परिसराचा विकास पाहून त्यांनी या समशानभूमीला प्रवेशद्वार म्हणून भव्य अशी कमान बनवून देण्याचा संकल्प त्यांनी केला होता त्या संकल्पाची आज दि 27 सप्टेंबर रोजी पूर्ती म्हणून त्यांनी या स्मशानभूमीच्या कमानीचे काम सुरू केले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हिंदू वैकुंठ धामण स्मशान भूमी म्हणजे जणू एक स्वर्गच मानवाचा अखेरचा प्रवास म्हणजे अंत्ययात्रा स्मशानभूमी पर्यंतचा हा प्रवास प्रिय व्यक्तींना अत्यंत क्लेशदायी असतो. याचे कारण बहुतांश गावांत स्मशानभूमी ही दुर्लक्षित, उपेक्षित अविकसित जागा म्हणून कशीबशी उभी असते. तिथवर जाण्याचा मार्गही अत्यंत बिकट असतो. तेथे कुठल्याही सुविधा नसतात. पण हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील वैकुंठ धाम स्मशानभूमी ह्याला अपवाद ठरत आहे. कारण येथील स्मशानभूमी परिवारातील कमिटीने मागील एक वर्षापासून या स्मशानभूमी परिसरात दर रविवारी 2 तास श्रमदान करून येथे अथक परिश्रम घेत तालुक्यातील लोकप्रतिनिधी सह या भागात लोकाभिमुख विकास कामे करून येथील परिसर हिरवा गर्द , नव नवीन झाडे, मृतदेह जाळण्यासाठीचे सुस्थितीत दैनिका ओटे व बाहेरगावावरून येणाऱ्या पाहुण्यांना हात पाय धुण्याची व्यवस्था , व शुद्ध पिण्याचे पाणी तसेच इतर सोई सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. हे पाहून नातेवाईकांचे दुःख इथवर येण्याचा क्षणभर का होईना निघून जाते अगदी अल्पकाळामध्ये या स्मशानभूमीचा कायापालट करण्यामध्ये या कमिटीचे खूप मोठे मोलाचे योगदान ठरले आहे पाहता पाहता ही स्मशानभूमी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुंदर स्मशानभूमी म्हणून नावारूपाला येत आहे त्यामुळे श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांनी येथील समिशन भूमीच्या विकास पाहून मंदिर कमिटी कडून त्यांनी या स्मशानभूमी परिसरात श्री शंभु शंकर महादेवाची एक मूर्ती व प्रवेशद्वारावर भव्य कमान बांधून देणार असल्याचे सांगितले होते त्या कमानीचे बांधकाम आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी मंदिर कमिटीच्या संचालकांच्या उपस्थितीत सुरू केले आहे त्यामुळे या स्मशान भूमीच्या विकासामध्ये अजून मोठी भर पडल्याचे शहरात बोलल्या जात आहे यावेळी परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, सदस्य संजय माने, विलास वानखेडे सह वैकुंठ धाम स्म भूमीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव सह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते……
चौकट
वामनराव पाटील यांच्या पुढाकारातून स्मशानभूमीत कावळा पंगत सुरू….
हिंदू धर्मामध्ये पितृपाठाच्या महिन्यांमध्ये आपल्या पूर्वजांना अन्नदान(जेवण करू घालण्याची ) करण्याची परंपरा असते त्यामुळे याला प्रेरित होऊन हिंदू वैकुंठधाम स्मशान भूमीचे सदस्य वामनराव पाटील मिराशे यांच्या पुढाकारातून दररोज वैकुंठ धाम स्मशान भूमी मध्ये एका सदस्याकडून वरण-भात येथील कावळ्यांना खाऊ घालण्याचा मानस त्यांनी सुरू केला आहे याला कावळा पंगत असे नाव देण्यात आले आहे याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे…..