हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहर व तालुक्यात आज दि 11 फेबुरवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाला यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी हिमायतनगर तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
हिमायतनगर शहरां सह तालुक्यातील सर्व गावात अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सायकाळी 4 ते 5 च्या सुमारास मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एकच धावपळ उडाली होती. तर शेती पिकात असलेल्या हरभरा, गहू,मिरची, ज्वारी, टरबुज, केळी, टोमॅटो, तुर यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर आंब्याच्या झाडाला आलेलं मोहर देखील मोठया प्रमाणात गळून पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ह्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देत आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी आज दि 12 फेब्रुवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी हिमायतनगर तहसीलदार यांच्या कडे केली आहे.यावेळी विजय वळसे पाटील, शहर प्रमुख गजानन हरडपकर ,गजानन गोपेवाड,साईनाथ कप्पलवाड,नागोराव गुंडेवाड, ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड,दिलीप ढोणे, दिलीपराव साळवे,गजानन वानखेडे वटफळीकर, शंकर भैरेवाड ,गौरव सुर्यवंशी, राजू जाधव,रामदास भडगे, सह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते