- बैठकीत चार जण इच्छुक….
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरात आज दिनांक 7 डिसेंबर रोजी बोरगडी रोड येथील बालाजी विद्यालय येथे तालुक्यातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांची व पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुकाप्रमुख पदाचा विषय चर्चेचा ठरला त्यात असंख्य शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार लवकरच हिमायतनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नवीन तालुका प्रमुखाची निवड जाहीर होणार आहे पण त्या निवडी चा निर्णय हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या कोर्टात अडकल्याची चर्चा शहरात रंगत आहे..
या बाबत सविस्तर वृत्त असे की दि 7 डिसेंबर रोज शनिवारी शहरातील बोरगडी रोड जवळ असलेल्या बालाजी शाळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बळीरामजी देवकते यांच्या अध्यक्ष खाली ही बैठक घेण्यात आली यावेळी तालुका प्रमुखा साठी इच्छुकाची मांदियाळी लक्षात घेऊन सर्वांची समजूत काढून शेवटच्या टप्प्यात चार जण इच्छुक राहिले त्यात माजी शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड बोरगडीकर,तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे , शिवसैनिक राम गुंडेकर, रामराव वानखेडे शाहीर हे चार जण तालुका प्रमुख पदासाठी इच्छुक असल्याकारणाने ह्यातील कुठल्याही एका नावावर स्पष्ट बहुमत न झाल्यामुळे ही बाब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या कोर्टामध्ये दाखल झाली असून पुढे निर्णय ते घेणार असा सर्वानुमते ठरविण्यात आले असल्याचे समजले त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिमायतनगर तालुका प्रमुख पदाची निवड लवकरच होणार आहे याकडे मात्र सर्व राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, सुभाष दादा शिल्लेवाड ,प्रमोद राठोड, बाळू अण्णा चौरे ,गोविंद पाटील करंजीकर ,रावसाहेब पाटील वटकळीकर,सुभाष दादा शिंदे मारोती सूर्यवंशी, रावसाहेब पाटील वरफळीकर, गजानन देवसरकर ,राजू पाटील कोठेकर ,विशाल राठोड, अमोल धुमाळे ,अमोल पाटील कामारीकर,हिमायतनगर युवा सेना तालुकाप्रमुख योगेश पाटील सोनारीकर ,श्रीराम पाटील वाघीकर , शिवदूत संतोष भाऊ पुलेवार ,गजानन पाटील पोटेकर, चेअरमन प्रवीण शिंदे, दीपक पाटील,गौरव पाटील, ज्ञानेश्वर राहुलवाड खडकीकर ,गोविंद पांडलवाड ,संदीप बलपेवाड, प्रल्हाद पाटील सूर्यवंशी, गजानन पाटील ,कपिल हराळे ,गणेश थोटे, सरपंच दत्ता गटकपवाड, चेअरमन नाईक ,जफरला लाला, इद्रिस शेवाळकर, सोहेल खान,शुभम दंडेवाड, सतीश शिंदे पळसपुरकर, अरविंद पाटील, संदीप देशमुख, पोटेकर, बंडु पाटील वडगाव , संतोष राठोड,सह असंख्य शिवसैनिक व युवा सैनिक व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते