हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी चेल्लार यांचा मुलगा विकास चेल्लार यांनी नुकत्याच झालेल्या भारतीय सैन्यातील बीएसएफ जी.डी.कॉन्स्टेबल या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तो उत्तीर्ण झाला आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातील विकास ने भारतीय सैन्य दलात दाखल झाल्याने पोटा येथील पपू सोळंके परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मौजे पोटा येथील घिसडी समाजात जन्म झालेल्या विकास चेल्लारच्या कुटूंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत जेम तेम असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर व आई-वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन विकासने भारतीय सैन्य दलात दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या या यशाबद्दल पोटा येथील पप्पू सोळंके यांच्या परिवाराने विकासचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बाबुराव सोळंके, होमगार्ड मेंढेवाड, ज्ञानेश्वर सोळंके शंकर सह आदीजन यावेळी उपस्थित होते