भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा…. आय जी. व आमदार यांच्याकडून इमरानच्या जिद्दीचे कौतुक..
हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यातील जवळगाव येथे माजी आमदार जवळगावकर यांच्या कन्येचा व कवळे गुरुजी यांच्या चिरंजीवांचा साक्षगंध सोहळा दिनांक 22 एप्रिल रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपनेते, तथा आमदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांच्यासह असंख्य आमदारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी जवळगाव येथील रहिवाशी कधीही मनात अपंग असल्याचा आकस न बाळगता जिद्द व चिकाटीच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन जगण्याची धडपड करणाऱ्या शेख इमरानला हिंगोली लोकसभेचे माजी खासदार तथा आमदार हेमंत पाटील(Hemant Patil) यांना भेटण्याचा मोह झाला हे पाहून आमदार हेमंत पाटील यांनी इमरानची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली व त्यांच्या जिद्द व चिकट दिला सलाम करून अजून मोठा हो व प्रशासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न कर अशा शुभेच्छा दिल्या.
त्यामुळे आमदार हेमंत पाटील यांनी मागील पाच वर्षाच्या काळात ह्या मतदारसंघातील सर्वांसोबत सलोख्याचे संबंध ठेवत सार्वजनिक कामासह वैयक्तिक कामांसाठी देखील जमेल त्या पद्धतीने ते नागरिकांच्या संपर्कात राहून सहकार्य केले आहे त्यामुळे जवळगाव येथील अपंग असलेल्या इमरानला आमदार हेमंत पाटील यांना भेटण्याचा मोह आवरला नसल्याचे दिसून आले….
या बाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची सुकन्या नेहाताई आणि भाजपा नेते उद्योजक मारोतराव कवळे पाटील गुरुजी यांचे चिरंजीव संदीप यांचा साक्षगंध दि 22 एप्रिल रोजी जवळगाव येथे मोठ्या आनंदात साजरा झाला ह्या कार्यक्रमाला हजारो चाहत्यांसह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आजी माजी आमदार खासदार,मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यावेळी शंभर टक्के दिव्याग असलेला जवळगावचा तरुण शेख इम्रान देखील आला होता.
त्याच्याकडे पाहताच पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, आ. बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांच्या समोरच आ. हेमंतभाऊ पाटील यांनी सुद्धा त्यांना हस्तांदोलन करून उच्चशिक्षित इमरानच्या अडीअडचणी व तब्येतीची विचारपुस करून त्यास धीर दिला अपंगा असून त्यांने उच्च शिक्षण घेतल्यामुळे शेख इमरानच्या जिद्द व चिकाटीचे यावी पोलीस महासंचालक शहाजी उमाप साहेब व शिवसेना उपनेते आमदार हेमंत पाटील यांनी कौतुक केले