हिमायतनगर तहसील कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या ! असंख्य विद्यार्थ्यांना कार्यालया बाहेर कामासाठी तासान तास ठाम मांडून रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.
हिमायतनगर प्रतिनिधी दि.१८: राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 15 जुलै पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्या सह हिमायतनगर येथील महसूल कर्मचारी सहभागी झाल्यामुळे शहरातील तहसील कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे येथील महसूल विभागाची कामे ठप्प पडली आहेत विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची तारांबळ उडाली आहे. तर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विविध ऑनलाईन दाखले काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र ह्याचा मनस्ताप नागरीकांना सहन करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यां संबंधी काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाला निवेदन दिले होते. मात्र त्याची शासनाने दखल न घेतल्यासमुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने 15 जुलै पासून महसुल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करण्याचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही. तोपर्यंत माघार घेणार नाही. अशी मनस्थितीत असलेल्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटने कडून सांगण्यात आले हिमायतनगर शहरातील सर्व महसूल कर्मचारी या संपात सहभागी आहेत शासनाने राज्यनेतृत्वाशी चर्चा करून महसूल कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा हे संप असेच सुरू राहील असा इशारा कोतवाल संघटनेचे तालुका अध्यक्ष हरीश प्रसाद गिरी यांनी दिला आहे त्यामुळे हिमायतनगर तहसील कार्यालयातील सर्वच महसूल कर्मचारी संपावर असल्याने तालुक्यातील असंख्य गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात कामासाठी आल्या हाती घरी परतावे लागत आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शैक्षणिक कागदपत्रसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र, लाडकी बहिण योजणेसाठी लागणाऱ्या शिधापत्रिकेत नाव वाढविणे, नाव कमी करण्यासाठीचे शपथपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्र काढण्यासाठी दररोज शेकडोच्या संख्येने नागरीक तहसिल कार्यालयात येतात पण सद्यस्थितीत येथील कर्मचारी संपावर असल्याने या कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची व नागरिकांचे कामे खोळंबली आहेत याची महाराष्ट्र राज्य शासनाने तात्काळ दाखल घ्यावी ही विनंती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
