अतिगंभीर डेंग्यू रुग्णावर आव्हानात्मक उपचार डॉ.दुर्गेश साताळकर
नांदेड दि.९: सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून तालुक्यातील नागापूर येथील मूळ रहीवाशी असलेल्या योगेश केरबाजी मस्के या २६ तरुणाचे अतिगंभीर डेग्यूं मधून मुक्तता करून देत त्यास जिवनदान दिले आहे , अतिगंभीर डेंग्यू मध्ये भयंकर तापासोबतच एकाचवेळी किंवा टप्प्याने ईतर शारीरीक अवयव निकामी होण्याच्या धोक्याच्या परिस्थितीतून तरुण रुग्णास मरणाच्या दारातून यशस्वीपणे परत आणत अतिगंभीर परिस्थितीत पोहचलेल्या डेंग्यूवर यशस्वी उपचार करत मोठी ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे अशी माहीती तज्ञ डॉ.दुर्गेश साताळकर, डॉ.मधूसूधन जाजू, डॉ. शशिधर पि. व यशोदा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने पत्रकार परिषेदेत देण्यात आली
या विषयी सविस्तर वृत्त असे की नागापूर ता.नांदेड येथील योगेश केरबाजी मस्के २६ वर्षीय तरुण रुग्णांस भयंकर ताप व अशक्तपणासह या लक्षणांसह अतिगंभीर अवस्थेतील डेंग्यू आजारात यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे ३० मार्च २०२४ रोजी दाखल करण्यात आले होते, सदरील रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर होती की तो अंथरुणावरुन उठू शकत नव्हता त्यास भयंकर ताप आलेला होता सदरील रुग्णास सुरुवातीला नांदेड येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु परिस्थिी गंभीर झाल्यानंतर सदरील रुग्णास यशोदा हॉस्पिटल येथे आणलेल्या रुग्णाला विलंब न लावता मल्टिसिस्टम इन्व्हॉल्व्हमेंटसह स्कर्व्ह ट्रॉपिकल इन्फेक्शनचे व सेवियर ट्रॉपिकल इन्फेक्शन विथ मल्टी सिस्टम इन्व्हॉलमेंट यासह मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याचे चान्सेस होते हे अती गंभीर प्रकरण आहे येथील तज्ञ डॉक्टरांनी तातडीने ओळखले.
अत्यंत कमी ऑक्सिजन पातळीमुळे रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. इनिलटल चाचणीमध्ये गंभीर थ्रोम्बोयटोपेनिया दिसून आला (खूप कमी प्लेटलेट संख्या तीही फक्त १४००० तसेच गंभीर परिस्थितील विकृत यकृत आणि किडनी फंक्शनशी) या परिस्थितीत ताबडतोब रुग्णाला हायर एंड आयसीयु मध्ये उपचार सुरू केले.
परंतु एंकदरीत गंभीर स्थिती लक्षात घेत आम्ही रुग्णाच्या पालकांना बोलावून घेत सर्व परिस्थिती समाजावून सांगितली की गंभीर स्वरुपाच्या डेंग्यु तापामध्ये एका मागे एक असे वेगवेगळे अवयव निकामी होण्याचे मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत त्यात रुग्णाच्या डोळ्यांना गंभीन ईजा होण्यास सुरूवात झाली होती व काही काळात कान,हात किंवा पाय गमावण्याच्या व जीवही जाण्याच्या भीतीची माहिती देण्यासाठी पालकांना बोलावले आणि पालकांना स्थिती अवगत करून दिली
परंतु आमच्या टिमच्या ८-९ दिवसांच्या रात्र-दिंवस अशा अथक आयसीयु मधील उपचार व परिश्रमानंतर मध्ये राहिल्यावर रुग्णाने त्याचे डोळे हळू हळू उघडायला सुरुवात केली आम्ही पालकांना कॉल केला आणि रुग्णाची सकारात्मक स्थिती सांगीतली त्यावेळी ते रडत होते, कदाचित त्यांची प्रार्थना कामी आल्याची भावना ते व्यक्त करत असावेत..
पुढील २ – ३ दिवसाच्या उपचारानंतर आम्ही रुग्णाचे व्हेंटिलेटर काढले आणि रुग्णास सामान्य आयसीयूत आणले त्यावेळी त्याच्या फुफ्फुसातील संसर्ग कमी झालेला होता त्याची ऑक्सीजनची आवश्यकता सुधारली होती , प्लेटलेट संख्या व ब्लड प्रेशर स्थिती स्थिर झाली होती आणि इन्फेक्शन पॅरामीटर्स चांगले झाले होते त्यानंतर सर्व प्रकारच्या तपासण्यानंतर शेवटी १५ दिवसांच्या सलग उपचारानंतर आम्ही रुग्णास यशस्वीपणे डिस्चार्ज करू शकलो याचे मोठे समाधान मिळाल्याची भावना डॉ. दुर्गेश साताळकर यांनी बोलून दाखविली ..
डेंग्युचा गंभीर तरुण रुग्ण वाचल्याचा मनोमन आनंद.. टिम यशोदा हॉस्पिटल
डेंग्युचा गंभीर तरुण रुग्ण वाचल्याचा आनंद आहे. त्याच्या पालकांच्या मदतीला आम्ही येऊ शकलो याचे समाधान आहे काही दिवसांनंतर आम्हाला सदरील रुग्णाचा फोन आला आणि मे महिन्यात त्याच लग्न होणार हे कळून आम्हा सर्वांना आनंद झाला.
चौकट :
गंभीर डेंग्यू ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जी प्राणघातक ठरू शकते.
वारंवार उलट्या होणे. तुमच्या मलमध्ये रक्त किंवा रक्त फेकणे. नाकातून रक्त येणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे. अत्यंत थकवा, अस्वस्थता किंवा चिडचिड होते बहुतेक लोक एका आठवड्याच्या आत बरे होतात. काही प्रकरणांमध्ये, लक्षणे खराब होतात आणि जीवघेणा होऊ शकतात. याला गंभीर डेंग्यू, डेंग्यू हेमोरेजिक फिव्हर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम म्हणतात.
जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात आणि गळती होते तेव्हा गंभीर डेंग्यू होतो. आणि तुमच्या रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करणाऱ्या पेशींची (प्लेटलेट्स) संख्या कमी होते. यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव, शॉक, अंतर्गत अवयवायात रक्तस्त्राव, अवयव निकामी होणे आणि प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड