डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वात कयाधू मधुपात्रात शिवप्रेमी उतरले
हिंगोली दि.३०: मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या नंतर सर्वत्र शिवप्रेमी नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय, आज हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे परिसरातील कयाधु नदी पात्रात शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने जल आंदोलन करण्यात आल आहे, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात शिवराय आमची अस्मिता असून पुतळा पडतोच कसा असा सवाल करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवप्रेमी डॉ. विठ्ठल रोडगे यांच्या वतीने करण्यात आली आहे, महाराज आम्हाला माफ करा,माफ करा म्हणत शेकडो शिवप्रेमी नागरिकांनी डॉ. विठ्ठल रोडगे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले आहे.
चौकट
महाराजांचा पुतळा पडलाच कसा,दोषींवर कठोर कारवाई करा,या मागणीसाठी शिवप्रेमी नागरिकांच कयाधू नदी पात्रात आत्मक्लेश आंदोलन केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड