हदगांव प्रतिनिधी /- जिजाऊ ब्रिगेडची जिल्हा कार्यकारणीची बैठक बोलवण्यात आली होती त्याबैठकीत सर्वांना मते हदगाव येथील जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षपदीसो मीनल ताई सूर्यवंशी हारडपकर यांची निवड करण्यात आली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव तालुका कार्यकारणी गठीत करण्या करीता नांदेड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष कल्पनाताई चव्हाण व नांदेड जिल्हा जिजाऊ ब्रिगेड ची पूर्ण टीम हदगाव येथे येऊन हदगाव तालुका अध्यक्ष यांची निवड सर्वानुमते करण्यात आली जिजाऊ ब्रिगेड हदगाव तालुका अध्यक्ष सौ मीनलताई जगन्नाथ सूर्यवंशी पाटील हरडपकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर बाकी हदगाव तालुका कार्यकारणी लवकरच गठीत करण्यात येईल असे सांगण्यात आले त्यानंतर सुमन गार्डन मंगल कार्यालय येथे जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.रेखाताई पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष पदाची निवड पार पडली या वेळी उपस्थित दिगंबर बिंदू कॉलेज भोकर चे प्राचार्य पंजाबराव चव्हाण . नांदेड जिल्हा अध्यक्ष कल्याण सर नांदेड जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई देशमुख हदगाव तालुका माजी अध्यक्ष सुमित्रा जगताप. सुशीला सुर्यवंशी. मीराताई पवळे पाटील. अमृते ताई. संजीवनी गोरबाड सह अनेक मान्यवर उपस्थित होते या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे