हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- दिनांक 18 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील मोजे पिंपळगाव (मिश्री) तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.राम महाराज पांगरेकर व प्रभाकर महाराज पुयड यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील मोजे पोटा येथील ह.भ.प.नागोराव गंगाधर मेंढेवाड यांच्या कामाची व कार्याची दखल घेऊन वारकरी संप्रदायामध्ये थोर संतांचे विचार ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे वारकरी म्हणून त्यांची ओळख असणारे ह.भ.प.नागोराव गंगाधर मेंढेवाड यांची आम्ही वारकरी सेवाभावी संस्थेच्या हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदि निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला…
यावेळी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक ह.भ.प.राम महाराज पांगरेकर, व्यंकटेश जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सचिव प्रभाकर पुयड, जिल्हा सहसचिव गंगाधर हंबर्डे, शिवहार मदनवाड, प्रवीण रोतुलवाड, रामराव माने हे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे काम करणाऱ्या 16 तालुक्याच्या तालुका अध्यक्ष पदावर निवडी करून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हिमायतनगर तालुका अध्यक्ष नागोराव गंगाधर मेंढेवाड, विनोद निमलवाड, दत्ता शिरडे, प्रकाश कलाने, भिवजी पतंगे, तातेराव जाधव, वैजनाथ ठोंबरे ,बाबुराव नखाते, परमेश्वर बंदुके विश्वनाथ डोखले, नागोराव वागतकर, मुकेश नखाते, रंगराव पाटील सूर्यवंशी, मारुती पांचाळ, गोविंद पवार सह असंख्य आम्ही वारकरी संप्रदायाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते