हदगाव प्रतिनिधी /-नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हदगांव वांरगा रस्त्यावरील कामात ठेकेदाराचे नियोजन बिघडल्याने गेल्या काही वर्षांपासून राहिलेल्या अर्धवट अवस्थेतील कामासह अद्याप प्रवासी निवारा उपलब्ध केले नाहीत. हदगांव वारंगा रोडवर बामणी फाटा पळसा येथील उड्डाणपुल बरडशेवाळा बायपास मुळे अनेक एसटी बस चढ उतार न घेता बाहेरूनच येजा करतात . नाईलाजाने खाजगी वाहनाने जिव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे.चालक वाहक च्या मनमानीमुळे शालेय विद्यार्थ्यासह प्रवास्यांना पुढील प्रवासास येजा करणा-यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो.
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गावरील बंद असलेले काम नवीन कंपनीकडून सुरूवात झाली आहे. प्रवासी निवारा होईपर्यंत अजून काही दिवस लागणार आहेत. नुकतीच शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली असून पावसाळ्यातील अडचण लक्षात घेऊन हदगांव वांरगा रोडवरील थांबा असलेल्या एसटी बस ने बाहेरून ये जा न करता शालेय विद्यार्थ्यासह प्रवास्यांची हेळसांड होणार नाही.याची काळजी घ्यावी अशी मागणी वीरशैव शिवा संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सविता विनोद निमडगे पळसेकर सामाजिक कार्यकर्ते दिनेश दहीभाते बरडशेवाळेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ नांदेड विभागीय नियंत्रक कार्यालयात विभागीय वाहतुक अधिकारी कमलेश भारती यांना लेखी निवेदनातून मागणी केली आहे.