नांदेड दि. १७ :- अनुज्ञप्ती (लायसन्स) व अनुज्ञप्ती विषयक सर्व कामकाजासाठी परिवहन विभागाच्या सारथी 4. 0 या प्रणालीद्वारे केले जाते. या प्रणालीवर अर्ज व शासकीय शुल्क भरण्याची कार्यवाही केली जाते.
परंतु सद्या सारथी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या सर्व्हरच्या देखभाल/दुरुस्तीचे काम राष्ट्रीय सूचना केंद्राद्वारे सुरु आहे. सदर दुरुस्तीचे कामकाज सुरु असल्यामुळे 18 मे 2024 च्या सकाळी 10 वाजेपर्यत सारथी प्रणाली बंद राहील, यांची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड