संभाजीनगर दि.२०: लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठीबीड जिल्ह्यात परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पांगरी कॅम्प येथील चौकात, मंगळवारी रात्रीओबीसी बांधवांनी रस्त्यावर टायरपेटवत दोन तास रास्ता रोको आंदोलनकेले. तर बुधवारी केज तालुक्यातील हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना झाले. शिरूर तालुक्यात हाकेयांच्या समर्थनार्थ बुधवारी कल्याण -विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्गावरील शृंगारवाडी येथे अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. केज तालुक्यातून हाके यांच्या आंदोलनासाठी १ लाख ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
ओबीसी आरक्षण बचाव मागणीसाठी उपोषणासबसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेयांच्या आमरण उपोषणाची सरकारने दखल न घेतल्याने, ओबीसी बांधव संतप्त झाले अाहेत.बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी धुळे-सोलापूरमहामार्गावर टायर जाळून आंदोलकांनी रास्तारोकोचा प्रयत्न केला. तर अंबड शहर दिवसभर बंदपाळण्यात आला. बुधवारी दिवसभरात १५ हजारसमाजबांधवांनी वडीगोद्री येथे भेट देऊन याआंदोलनाला समर्थन दिले. यात एकट्या केजयेथून दोनशे, पाटोदा येथून शंभर वाहने आलीहोती. हिंगोलीतूनही ४०० वाहनांनी ओबीसी बांधववडीगोद्रीत आले. दिवसभरात एकूण ७०० पेक्षाजास्त वाहने वडीगोद्रीत आली होती. १३जूनपासून वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरु केलेआहे. मंगळवारी सायंकाळी धुळे-सोलापूरमहामार्गावर वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलनझाले होते. तर बुधवारी दुपारी पुन्हा संतप्तआंदोलकांनी याच महामार्गावर टायर जाळून रास्तारोकोचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेपकेल्याने आंदोलक माघारी फिरले.
#सत्यप्रभा न्युज # संभाजीनगर