हिमायतनगर प्रतिनिधी/- वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी सावता माळी यांची आज दि 16 जुलै रोजी पुण्यतिथी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथील सभागृहात माळी समाज बांधवांन कडून साजरी करण्यात आली यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक अक्कलवाड सर यांनी असे सांगितले की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत ज्या संतांला आपल्या कामातच विठोबा दिसत होता. आपल्या कामातच देव शोधण्याचा संदेश त्यांनी दिला होता अशा संत सावता माळी यांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगिकारावे असे प्रतिपादन अक्कलवाड सर यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता माळी यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले
त्यानंतर या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित अनेक प्रमुख मान्यवरांनी संत सावता माळी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले व त्यानंतर शहरातील समस्त माळी समाज बांधवांकडून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अक्कलवाड सर, वरहाले सर,गणेश शिंदे, शंतीलाल श्रीश्रीमाळ, आशिष भाऊ सकवान, किशनराव वानखेडे, विठ्ठल ठाकरे,संजय माने,विलास वानखेडे,मारोती हेंद्रे,सुभाष मामा शिंदे ,रामभाऊ सूर्यवंशी, शामभाऊ ढगे,सदाशिव सातव, दिगाबर काळे, महेंबा होळकर, परमेश्वर वानखेडे, सटवाजी हेंद्रे, रामदास हेंद्रे,दत्ता काळे,गोविंद शिंदे,प्रदीप जाधव,पत्रकार संजय कवडे ,नागेश शिंदे सह आदी माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते