धर्माबाद दि.२२:
नागनाथ मळगे
धर्माबाद तालुक्यातील रोषनगाव येथे गावसणा निमित गावात आसलेल्या लक्ष्मीपूजनाचे पुजन करून प्रत्येक घरामध्ये माेठ्या आनंदाने उत्साहात महीला व पुरुष मंडळींनी हा सण साजरा केला गावसणा निमित्त लक्ष्मी मातेच्या मंदिराला रंगरगोटी करण्यात आली होती.
पौष महिना आसल्याने लक्ष्मी मातेला माटावर दिवा लावून तो माट डोक्यावर घेऊन महिलांनी आळंक्या काढल्याने गावात दिव्यांची रोषणाई दिसत होती . गोदावरी नदीच्या पाण्याने लक्ष्मी मातेच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला . हरभऱ्याची हिरवी भाजी, दहीआंबील ने भरलेले कळस मांडून वरण-भाताचे ऑप्पल – वडे शेंगोळ्या चा नैवेद्य ठेऊन लक्ष्मी मातेच्या मुर्ती ची सुंदर सजावट करून आरती करण्यात आली गावकऱ्यांच्या वतीने दि. 22 रोजी सार्वजनिक महाप्रसाचे आयोजन करण्यात आले आहे
दीपाेत्सव पर्वातील सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या गावसणात माता लक्ष्मी माता पूजनाचा साेहळा उत्साहात साजरा करण्यात आला यात गावातील महिला पुरुष तसेच पाहूने मंडळी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड