हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज दि 28 नोव्हेंबर रोजी शहरातील महात्मा फुले सभागृह येथे पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील महात्मा फुले सभागृह येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित समाज बांधवांना व गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त शिक्षक अक्कलवाड सर यांनी असे सांगितले की सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम समाजात केली त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने त्यांनी समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज आदरांजली वाहन्या साठी हिमायतनगर शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे आजच्या तरुण पिढीने महात्मा फुले यांचे विचार अंगी कारावे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ,डॉ. दामोदर राठोड,परमेश्वर वानखेडे, मायंबा होळकर, दिगाबर काळे,सुभाष शिंदे,श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त विलास वानखेडे,संजय माने, मारोती लुमदे सह आदींनी समाज बांधवांना व कार्यकर्त्यांना या प्रसंगी अनमोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. दामोदर राठोड यांनी असे सांगितले की ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून आजवर काम केले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी 1888 मध्ये बहाल केली. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय घेत त्यांनी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852 मध्ये शाळा स्थापन केली असे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबां फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी शहरातील महात्मा फुले सभागृह येथे गावातील प्रतिष्ठित नागरिक व राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल, मांयबा होळकर, शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, ज्ञानेश्वर शिंदे,सुभाष बलपेलवार, पापा पार्डीकर, परमेश्वर वानखेडे दिगंबर काळे, गणपतराव ढगे, रामदास हेंद्रे, श्याम ढगे, सुभाष शिंदे,विठ्ठल चव्हाण,राम जाधव, प्रतापराव माने, वामनराव हेंद्रे, बबलू काळे,साहेबराव आष्टेकर, मनोहर जाधव, भारत डाके,गणेश दळवे,नंदू हेंद्रे,अनिल नाईक, सावन रावते,सदानंद काळे, सह आदी समाज बांधव व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते