हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- महाराष्ट्रातील धनगर समाजांना मूळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासाठी आज दि 13 डिसेंबर रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरा पासून मूळ आदिवासी बांधवांचा विराट मोर्चा हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये हजारो महिला मुली व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 13 डिसेंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्याचा विराट मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात तालुक्यातील आदिवासी बांधव व महिला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून धनगर जात किंवा इतर कोणत्याही जातीला आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, धनगर जातींना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती तात्काळ रद्द करावी, धनगर जात व आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ने राज्य शासनाला सादर केलेला अहवाल हिवाळी अधिवेशनात जाहीर करून जनतेसमोर आणावा यासह हिमायतनगर येथील आदिवासी मुला मुलींचे वस्तीग्रह व सुविधेसह स्वातंत्र्य इमारत बांधण्यासाठी शहरालगत जागा उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्याचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल यांना हिमायतनगर येथील तहसीलदार मार्फत देण्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट ऑफ इंडिजिनस पीपल्स आणि ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रॅव्हल या आदिवासी संघटनांच्या मार्फत हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर हजारो आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा धडकला तेव्हा तेथे तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांचे ज्येष्ठ नेते तथा सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक दत्तात्रेय वाळके साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गायकवाड साहेब, संजय माझळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यवृत्त ढोले,यांच्या सह ज्येष्ठ नेत्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत येथील तहसीलदार यांना आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्याचे निवेदन देऊन तात्काळ याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली….
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यवृत्त ढोले, संजय माझळकर, डॉक्टर संजय धुमाळे, गजानन बुरकुले, आर.जी. बोडके, विश्वंभर वानोळे, मारोती बेले ,मारोती गवले, रामदास भडंगे, पुंडलिक तरटे, अभिषेक खुपसे, रामराव भिसे, वसंतराव डवरे, रामदास वाळके, पृथ्वीराज बुरकुले, शिवाजी अंभोरे ,पांडुरंग दुधाडे, जयराम ढोले, रामा मिरासे, साहेबराव बेले, दत्ता काटमोडे,डॉ. मारोटी वाकोडे, सह आज आदिवासी समाज बांधव व महिला हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव या विराट मोर्चा मध्ये सहभागी झाला होता… यावेळी पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनूर यांनी काटेकोर पोलीस बंदोबस्त लावून आदिवासी समाजाच्या विराट मोर्चाला पोलीस प्रोटेक्शन दिले त्यामुळे हा मोर्चा शांततेत पार पडला….