नांदेड दि.२९ : नांदेड शहरात शहर बस वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी यासंदर्भात नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त श्री डॉ.महेश डोईफोडे यांना फुले,शाहू,आंबेडकर विद्यार्थी कृती समिती नांदेड तर्फे निवेदन सादर करण्यात आले,
निवेदनात नमूद केले आहे की
नांदेड शहरात पूर्वी शहर बस सेवा कार्यरत होती पण सध्या बंद असल्याकारणाने नांदेड शहरात जिल्ह्यातील 16 तालुक्यातील विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी ये- जा करत असतात विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेवर जाण्यासाठी ऑटोरिक्षा मिळत नसतो मिळाला तर खाजगी प्रवासी ऑटोरिक्षा चालक अवाच्या-सव्वा रुपये भाडे आकरत आहेत बस स्थानकापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,दंत रुग्णालय,विद्यापीठ परिसर, अभियांत्रिकी महाविद्यालय हे विष्णुपुरी परिसरात लांब असल्याकारणाने खाजगी रिक्षाने येणे जाण्यात विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा जास्त प्रमाणात जात आहे व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच शहरातील पोलीस भरती करणारे विद्यार्थी त्यांना शहरात पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याकारणाने ते विद्यार्थी सध्या विद्यापीठ विष्णूपुरी परिसरातील मैदानावर सराव करण्यासाठी जात आहे. विद्यार्थी हितासाठी व सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून नांदेड शहरात शहर बस सेवा सुरू करावी सदरील मागणी 30 दिवसात मान्य न झाल्यास समिती आपल्या कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने उपोषण करेल असा इशारा सुद्धा समितीने दिला या वेळी समिती समन्वयक लक्ष्मण वाठोरे व प्रकाश इंगोले उपस्थित होते..
#सत्यप्रभा न्युज #नांदेड