हिमायतनगर प्रतिनिधी | सर्वत्र उन्हाच्या झळांनी जनता त्रासून गेलेली असताना. पैनगंगा नदीकाठावरील जनावरांना व नदीकाठावरील गावच्या रहिवाशांना पिण्यासाठी पाण्याची भटकंती करावी लागत आहे. राखीव कोट्यातील पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडल्यास जनावरांची पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होईल. तसेच नदीकाठावरील गावतील सार्वजनिक नळांना पाणी येईल व पिण्यासाठी नागरिकांना पाणी मिळेल व लोकांची पाण्यासाठी चाललेली पायपीट थांबेल. अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार श्री.ताडेवाड साहेब, तहसील कार्यालय,हिमायतनगर यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
पाणी सोडल्यानंतर बोरगडी, धानोरा, वारंगटाकळी, देवरंगा, मुरली व तसेच मंगरूळ पर्यंत पाणी पोहचेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पाणी सोडण्याचा निर्णय पाच दिवसात घेऊन प्रशासनाने आमच्या जनतेची तहान भागवावी. अन्यथा नाईलाजाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने मंगरूळ येथील नदीपात्रात आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा श्री.संतोष आंबेकर, जिल्हाउपाध्यक्ष यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
यावेळी युवराज जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रदिप राठोड,, नारायण देवकते , मधुकर येनेकर,श्रीराम सुदेवाड ,विजय वळसे ,बालाजी पावडे, प्रकाश हाके, शंकर गुंडेराव, आनंदा मोहिते, सदाशिव कदम, गोविंद तवर , प्रदीप राठोड व तानाजी निकम आदींसह परिसरातील विविध पक्षाच्या पदाधिकारी व गावकऱ्यांची उपस्थिती होती.