नांदेड दि.८: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव पदी प्रो. डॉ. शशिकांत ढवळे हे रुजू झाले आहेत प्रो. डॉ. ढवळे यांना बुलढाणा येथील फार्मसी कॉलेज मधील सात वर्षे प्राचार्य पदाचा अनुभव आहे. त्यानंतर त्यांनी गोव्हर्नंमेन्ट कॉलेज ऑफ फार्मसी कराड आणि छत्रपती संभाजी नगर येथे नऊ वर्षे सहयोगी प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवा दिलेली आहे. गेली बारा वर्षापासून ते विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. यादरम्यान ते संकुलाच्या संचालकपदी ही कार्यरत होते. विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणावर त्यांनी यशस्वीरित्या काम केले आहे. यापूर्वी विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ. सर्जेराव शिंदे हे होते. त्यांना त्यांच्या मूळ प्राचार्य पदी रुजू होण्यासाठी संस्थेने बोलवल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी आता प्रभारी कुलसचिव म्हणून प्रो. डॉ. शशिकांत ढवळे दि. १ जानेवारी पासून रुजू झाले आहेत. कुलसचिव पदाला चांगला न्याय देऊन प्रामाणिकपणे कामे करू अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या. याशिवाय विद्यापीठ परिसरातील आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड