नांदेड दि.१३:जागतिक दिव्यांग दिनी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकडून विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिव्यांगा जवळ येऊन स्वीकारले नाही. त्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात राग भरला व सकल दिव्यांग संघटना यांनी आधिका-याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे
. परंतु कोणत्याही प्रकारची दखल न घेता गुन्हे दाखल झाले नसून ते गुन्हे त्वरित दाखल करा अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने पुन्हा पोलिस प्रशासनाकडे फेर तक्रारीचे निवेदन देऊन केली आहे.
सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना व निधी दिला जातो परंतु या ठिकाणी निधी खर्च केला नसल्याने व दिव्यांगांच्या शासन निर्णयीत मागण्या संदर्भात वारंवार निवेदन देऊनही ते मान्य होत नसल्याने जागतिक दिव्यांग दिनी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते परंतु या मोर्चेत दिव्यांगांची तक्रार घेण्यासाठी कुठलाच अधिकारी कर्मचारी मोर्चे करू दिव्यांगांजवळ आला नसल्याने दिव्यांगांनी अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासनाकडे गुन्हा दाखल करण्याची विनंती करून तक्रार दिली परंतु त्या तक्रारीची कुठल्याच प्रकारची अद्याप दखल घेतली नाही. व गुन्हा सुद्धा दाखल झाला नसल्यामुळे पुन्हा एकदा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने त्वरित गुन्हे दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील आणि देविदास उर्फ पिंटुदादा बद्देवाड यांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड