हिमायतनगर प्रतिनिधी/-तालुक्यातील सर्व राशन कार्ड लाभार्थ्यांनी आप आपला आधार क्रमांक जवळच्या राशन दुकानदाराकडे जाऊन आपल्या कुटुंबाचे ई-केवायसी करून घ्यावे असे आव्हान हिमायतनगर येथील पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे तालुक्यातील राशन लाभार्थ्यांनी तात्काळ ई केवायसी करून घेण्या संदर्भात आदेश काढला असून त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील राशन दुकानदारांकडून कार्ड धारकांचे ईकेवायसी करणे सुरू आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यानी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावे असे आवाहन हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर, पुरवठा निरीक्षक छाया नागर्थवार यांच्या मार्फत करण्यात आले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सर्व राशन लाभार्थ्यांनी आप आपल्या राशन दुकानदाराकडे जाऊन लवकरात लवकर आपल्या कुटुंबाची ई-केवायसी करून घ्यावी ईकेवायसी करण्याची आपल्याला ठरावीक मुदत दिली आहे त्यामुळे वेळेवर दुकानदारांकडे रांगा लावून गर्दी करण्यापेक्षा आत्ताच आपण लवकरात लवकर ई केवायसी करण्यासाठी कार्ड धारकांनी आपल्या राशन दुकारदारांकडे जाणे आवश्यक आहे. ज्यांची नावे राशन कार्ड वर आहेत त्यांनी आपले अधार कार्ड घेवून जावून आपल्या हाताचे ठसे द्यावे, एका कार्डसाठी एक ते दोन मिनिटाचा वेळ लागेल त्यामुळे प्रत्येकांनी ईकेवायसी करून घेणे बंधनकारक आहे अन्यथा आपले राशन कार्ड बंद होऊ शकते किंवा धान्य कमी मिळू शकते असे तहसीलदार सौ पल्लवी टेमकर व पुरवठा निरीक्षक छाया नागर्थवार यांनी सांगितले आहे व काही लाभार्थ्यांच्या राशन कार्डच्या आरसी बंद झाल्या संदर्भात काही तक्रार असेल तर संबंधीत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येऊन आपली आरसी पुन्हा सुरू करून घ्यावी असे आव्हान हिमायतनगर च्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांनी केले आहे