सेंद्रिय मानांकन एन पी ओ पी चे आठवे संस्करणाचे उद्घाटन संपन्न
नांदेड दि.१०: वाणिज्य व उद्योग मंत्रालय तर्फे दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सेंद्रिय मानांकन एन पी ओ पी चे आठवे संस्करणाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.या अंतर्गत सेंद्रिय प्रमाणिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व त्यांच्या व्यवसायाशी निगडित व्यावसायिक लोकांना भारतातून सेंद्रिय उत्पादने निर्यात करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे. हे मानांकन बनवण्यासाठी अनेक प्रस्तावांवर चर्चाही करण्यात आली होती व त्याप्रमाणे कडक निर्बंध बनवून हे सेंद्रिय मानांकन एन पी ओ पी लोकांसाठी तयार करण्यात आले आहे.
या एन पी ओ पी मानकाची ठळक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणीही जर सेंद्रिय प्रमाणपत्र शिवाय सेंद्रिय म्हणून विकत असेल, शेतकरी, व्यावसायिक, अन्नप्रक्रिया उद्योग इत्यादी तर त्याच्यावर खूप दंड लागणार व त्याचबरोबर कायदेशीर कारवाई करण्यात येणार. प्रमाणिकरण कार्यक्रमांमध्ये जर का काही त्रुटी असतील तर त्यामध्येही भरपूर दंड आकारला जाणार प्रमाणीकरण संस्था असो अथवा कंपनी अथवा शेतकरी कंपनी तथा सर्विस प्रोव्हायडर यांना. तसेच मार्गदर्शक संस्था कन्सल्टंट व्यक्ती व फ्रीलान्सर यांच्यावरही अंकुशही ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमा मध्ये एफ एस एस ए आय, डी जी एफ टी व कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय, अपेडा, एन सी ओ एल याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.या कार्यक्रमासोबतच डिजिटल प्रणाली टऱेस नेट २.० व इतर डिजिटल ॲप्स यांचे नवीन संस्करणाचेही यावेळी औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड