हदगाव/हिमायतनगर :- सर्व सामान्य जनतेसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजना सर्व आरोग्य योजना सामान्यांपर्यंत वेळेत पोहचल्या पाहिजे. तेव्हाच या उत्तम योजनांची खऱ्या अर्थाने अमलबजावणी झाली असे म्हणता येईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून आणि खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने ह्या आरोग्य योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महाआरोग्य शिबिराला मा. सभापती अंकुश आहेर, तालुकाप्रमुख राजु चापके, सरपंच स्वाती अंभोरे, मा. जि.प. सदस्य संजय परिहार, राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष अदित्य आहेर, संतोष शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनुराधा गोरे, सारंग डफडे, दता अंभोरे, प्रदीप कदम, अक्षय कदम, गोविंद राखोंडे, , यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना मा. सभापती अंकुश आहेर म्हणाले की, ग्रामीण भागातील सर्व वयोवृद्धांना आता सर्व आजारावर मोफत आरोग्यसेवा मिळत असल्याने, वयोवृद्धासह सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी मोठा लाभ असल्याचे ते म्हणाले मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संकल्पनेतून व खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने जवळा बाजार येथील महाआरोग्य शिबिरामध्ये एकूण ४४५ जणांनी विविध आजारांची तपासणी केली आहे. यामध्ये सिकलसेल ७८, एच आय व्ही २८, सीबीसी ७६, एच बी सी ५८, बी एस एल ३२, एल एफ टी ५७, के एफ टी ४२, आर बी एस ६२, थुंकी १२, इतर रोग यामध्ये एकुण ४४५ यांनी तपासणी केली आहे.
या सर्व रुग्णांना औषधोपचार व योग्य मार्गदर्शन डॉक्टरांच्या पथकाने केले या महाआरोग्य तपासणी शिबिराला मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे ज्ञानेश्वर घोगरे, डॉ.विशाल वाघमारे, डॉ. शुभांगी अडकिणे, डॉ.प्रतिक्षा देशमुख, डॉ. गजानन महाजन, डॉ.किरण राऊत, डॉ. पल्लवी आहेर , डॉ. सुमन कुंदनानी, एल. एच. व्हि. छाया लोंढे, औषधी निर्माण अधिकारी बि.व्हि.कुंटे, गजानन सोनटक्के, ए. एस. सोळंके, व्हि.एस. उदगिरे, पी.पी.मावळे, विनोद राठोड, विजयालक्ष्मी शिंदे, एम. डी. पारटकर, आर. डी. वाघमारे, एम. आर. पारटकर, एम डी पोपळघट, आरडी रोडे, यांच्या उपस्थितीत जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश शिंदे यांनी केले तर यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक यांनी विशेष परिश्रम घेतले.