सिंधुदुर्ग दि.२८: : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्याचा परिणाम राज्यभर दिसून येत आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर मोर्चा काढला. त्यामुळे महाविकास आघाडीचे काही नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले. महायुतीचे माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, त्यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे हेही राजकोट किल्ल्यार येथे आले होते. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या मूर्तीची संपूर्ण माहिती केव्हा बसवली? कोणी बनवली? काय कारवाई केली? तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघु शकता.
शिवरायांच्या कोसळलेल्या मूर्तीची संपूर्ण माहिती
कधी सहकारी तर कधी कट्टर विरोधक असलेले नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी हस्तांदोलन केलं. महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चात (Political rada at Rajkot Fort) माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे समर्थकही राजकोट किल्ल्यावर होते. तेव्हा ठाकरे आणि राणे समर्थक एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राजकोट किल्यासमोर, विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हा राडा सुरू असताना पोहोचले. यावेळी पेंग्विन अशी घोषणा करण्याचा प्रयत्न झाला. आदित्य ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी निघून गेले.
राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जावु देणार नाही असा इशारा दिला. तेव्हा आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक तिथेच बसले. त्यानंतर वैभव नाईक यांनी १५ मिनिटांत आम्हाला हालु दिले नाही तर, आम्ही आमची ताकद दाखवू असे ते म्हणाले. त्यामुळे राणे समर्थक अधिकच संतप्त झाले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड