Ajit Pawar News: पुणेकरांना वाहतुक कोंडीतून दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) ताफ्यात लवकरच 1,500 नवीन बसेस दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भेकराईनगर बुद्रुक आणि माण येथील दोन ई-बस डेपोचे ऑनलाइन उद्घाटनही पार पडले. या नव्या बसेसमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम होईल आणि पुणेकरांना वाहतुक कोंडीतून दिलासा मिळेल.
PMPML स्वतःच्या निधीतून 500 बसेस खरेदी करणार आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून (PCMC) 500 सीएनजी बसेस आणि 500 ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एकूण 1,500 बसेस लवकरच सेवेत येतील असे अजित पवार यांनी सांगितले. या बसेस पर्यावरणपूरक असतील आणि त्या पुणेकरांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भेकराईनगर बुद्रुक आणि माण येथील दोन ई-बस डेपोचे ऑनलाइन उद्घाटनही पार पडले. या नव्या बसेसमुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम होईल आणि पुणेकरांना वाहतुक कोंडीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. या ई-बस डेपोच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार यांच्यासह आमदार अण्णा बनसोडे, आशिष शेलार, PMC आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, PMPML अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह आणि PCMC आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 2041 पर्यंत 41 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. या वाढत्या गरजांसाठी रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि वाहतूक सेवांचा विस्तार करण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच, पाणीपुरवठ्यासाठी ठोकरवाडी आणि मुळशी धरणातून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय शहराला लागणारी पाणी आवश्यकता लक्षात घेऊन वाढीव गरज भागवण्यासाठी ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून मुळशी धरणाचेही पुरेसे पाणी मिळणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.