हिमायतनगर प्रतिनिधी:- शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाचे प्रा.आशिष दिवडे यांना दि 15 डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत पर्यावरण शास्त्र या विषयात हु.ज. पा.महाविद्यालय हिमायतनगर येथील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आशिष अशोकराव दिवडे यांनी डॉ राजकुमार पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली,” स्टडीज ऑन स्टेटस ऑफ एअर पोल्ल्युशन इन नांदेड सिटी अँड इट्स इम्पॅक्ट ऑन बायोलोजिकल अस्पेक्ट” या विषयावर पीएच.डी. पदवीसाठी विहित कालमर्यादित विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना मौखिकी नंतर आज विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.आशिष दिवडे यांनी पर्यावरण शास्त्राचे ते गाढे अभ्यासक व मूलभूत संशोधक असून विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेत. दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी नवीन व समाजोपयोगी केलं पाहिजे या भावनेतून ते गेली दहा वर्षापासून सतत प्रयत्नशील असतात. अशा अभ्यासू आणि जिज्ञासू प्राध्यापकाने पर्यावरण शास्त्रातील,”स्टडीज ऑन स्टेटस ऑफ एअर पोल्ल्युशन इन नांदेड सिटी अँड इट्स इम्पॅक्ट ऑन बायोलोजिकल अस्पेक्ट” या महत्त्वाच्या विषया वरती त्यांनी केलेले मूलभूत संशोधन हे नक्कीच समाजोपयोगी ठरणार आहे. अशी भावना बहिस्थ परीक्षक डॉ. प्रवीण मेश्राम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली . नांदेड शहरातील वेगवेगळ्या भागातील वायु प्रदूषणाची अत्यंत सर्वंकष आणि चतुरस्त्र स्वरूपात त्यांनी आपल्या संशोधनाची व्यवस्थित मांडणी उपस्थितांसमोर करून , वायु प्रदूषणामुळे होणारे वातावरणीय बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत मौलिक पद्धतीने विशद केला. याप्रसंगी भूशास्त्र संकुलाचे प्रभारी संचालक टी.विजयकुमार , विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. अर्जुन भोसले ,प्राचार्या डॉ.उज्वला सदावर्ते ,प्राचार्य डॉ. सुधीर शिवनीकर, प्रा. महेश वाखरडकर ,प्रा. मुकेश यादव , डॉ.अश्टूरकर यांच्यासह अनेक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते त्यांच्या या यशाबद्दल मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मा. सूर्यकांताताई पाटील, सचिव श्री अरुण कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते, कार्यालयीन अधीक्षक श्री संदीप हरसुलकर सह महविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.