मुदखेड प्रतिनिधी शेख जब्बार दि२२. काँग्रेस पक्ष सर्व जाती-धर्माला व शेतकरी कष्टकरी यांना मानणारा असल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जुळून आहोत काँग्रेस पक्ष मजबूत कसा करता येईल यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत! येनाऱ्या लोकसभा विधानसभा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समीती व ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षा मजबुत करू राजकारनात पक्षा मुळे व्यक्ती मोठा होतो आणि मोठा झालेला व्यक्ती जर पक्ष सोडून जात असेल तर त्या व्यक्तीचा आणि त्या पक्षाच दुर्दैव म्हणावं लागेल.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांच्या सोबत तालुक्यातील एकही निष्ठवांत काँग्रेसचा कार्यकर्ता भाजपात गेला नसून जे कोणी गेल्याचे दाखवत आहेत ते कधीच मनाने काँग्रेस पक्षात नव्हते पद घेन्यासाठी कॉग्रेस पक्षात आले होते व आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेत असे प्रतिपादन माजी सैनिक तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी केले आहे. २० फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी मंत्री श्री शिवाजीराव मोघे मराठवाडा प्रभारी,नांदेड जिल्हा समन्वयक मा.आमदार ईश्वरराव भोशीकर,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद पाटील शिंदे नागेलीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना देवदे म्हणाले मुदखेड शहर काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. पूर्वीपासूनच मतदार संघात काँगेस पूर्ण पणे रुजलेली आहे.मुदखेड तालुक्यातील मुस्लिम,दलित,ओबीसी समाज कायम काँग्रेस पक्षाच्या बाजूने असून काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल या संदर्भात या आढावा बैठकीच्या निमित्ताने आम्ही आमची बाजू पक्षसृष्टीकडे मांडली आहे. यावेळी बारड चे माजी उपसरपंच प्रतापराव देशमुख नगरसेवक गौस सेठ,यूवक काँग्रेस शहर अध्यक्ष,हाजी मुलत्तानी शेठ,रफीक मसालेवाले इकबाल कुरेशी,फारूख बागवान,बबलु भाई यांच्यासह इतर कार्यकरते उपस्थित होते !
#सत्यप्रभा न्युज #नांदेड