हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील एकलव्य स्टडी सर्कलचे 42 विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेच्या गुणवत्ता यादीत घवघवीत मार्क घेऊन यश संपादन केले शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये हिमायतनगर शहरातील ओ.बी.सी.प्रवर्गातून प्रदीप आनंद गायकवाड या विद्यार्थ्याने घवघवीत असे यश संपादन करून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे त्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर शहरातील एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक एन.टी सर व सुलतान सर यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMS) परीक्षेच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या क्लासच्या 42 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या सर्व शिष्यवृत्ती मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक एन. टी सर व सुलतान सर यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले यावेळी हिमायतनगर शहरातील प्रदीप आनंद गायकवाड या विद्यार्थ्यांने एन.एम.एम.एस या परीक्षेमध्ये ओबीसी प्रवर्गातून घवघवीत असे यश संपादन करून या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरला आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल ,जिल्हा सरचिटणीस आशिष भाऊ सकवान, आदर्श शिक्षक सचिन कळसे सर, दिलीप कोंडामंगल सर ,पत्रकार दिलीप शिंदे ,नागेश शिंदे सह संभाजी गायकवाड, आनंद गायकवाड, अवधूत गायकवाड सह आदींनी प्रदीपचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या