नांदेड दि.२५: नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांनी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास मार्गदर्शन करुन घरफोडी व चोरीचे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले.
दिनांक 26.11.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीतील फरांदेनगर येथील श्री रविंद्र जोशी महाराज यांचे घरी घर फोडी होवुन सोन्या चांदीचे दागिणे व इतर साहीत्य चोरीस गेल्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं. 452/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलीस स्टेशन भाग्यनगर पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड यांनी सदर घटने बाबत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर घटनास्थळ व परिसरातील सि.सी. टिव्ही कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेणे कामी वेळोवेळी मार्गदर्शन केले.त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमंलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन सतत 15 ते 20 दिवस फरांदेनगर, मौरचौक, छत्रपतीचौक, बजाजनगर, एकतानगर व नांदेड शहरातील विविध ठिकाणचे 200 ते 250 सि.सी. टिव्ही फुटेज चेक करुन सदर घर फोडी मधील आरोपीचे फुटेज हस्तगत करुन आरोपीची ओळख पटवली.
दिनांक 23.12.2023 रोजी पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार असे पोलीस स्टेशन हदीत घरफोडीचे गुन्हयातील व इतर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी व पेट्रोलींग करीत असतांना एक इसम हा जिरायत मैदान परिसरामध्ये संशयीत रित्या फिरत असतांना दिसुन आला. तो पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सदर इसमांचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले असता त्याचे बारकाईने निरीक्षण करता सि.सी. टिव्ही फुटेज मधील इसम व ताब्यातील इसम हे एकच असल्याची खात्री झाल्याने गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार याना त्यांचे ताब्यात एक लोखंडी रॉड, पक्कड व हातोडी असे घर फोडी करण्याचे साहीत्य मिळुन आले. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत ऊर्फ अभय पिता देवराव राऊत वय 25 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बेलानगर, भावसारचौक, नांदेड असे सांगितले. त्याचे कडील साहीत्या बाबत विचारल्याने त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणुन सखोल चौकशी केली असता त्याने पोलीस स्टेशन भाग्यनगर हदीत विविध ठिकाणी वेगवेगळया वेळी घरफोड्या केल्याचे कबुल केले. आरोपी अभिजीत ऊर्फ अभय पिता देवराव राऊत याने पोलीस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावर नोंद असलेला गु.र.नं. 452/2023 कलम 454,457,380 भा.दं. वि. व इतर 11 अशा एकुण 12 घर फोडीच्या गुन्हयाची कबुली दिली आहे. त्याचे कडुन वरील 12 घर फोडी पोलीस स्टेशन भाग्यनगर अभिलेखावरील घरफोडीच्या गुन्हयातील 35 तोळे सोने, 500 ग्रॅम चांदी, लॅपटॉप, टिव्ही, मोबईल, टॅब, कॅमेरा असा 25,65,000/-रुचा मुद्देमाल जप्त करुन चांगली कामगिरी केली.
सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा.श्री सुरज गुरव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, नांदेड शहर, नांदेड, पोलीस निरीक्षक श्री सुर्यमोहन बोलमवाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी पो.उप.नि. सुनिल भिसे व पोलीस अमंलदार पोहेकॉ/709 दिलीप राठोड, पोहेकॉ/1098 गजानन किडे, पोहेकॉ/818 प्रदिप गर्दनमारे, पोकॉ/710 ओमप्रकाश कवडे व पोकॉ/516 हनवता कदम पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड व सायबर सेल येथील पोहेकॉ/1242 राजेंद्र सिटीकर यांनी पार पाडली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड