Narendra Modi On Pahalgam Terrorist Attack: काश्मीरच्या पहलगाममधील (Pahalgam Terrorist Attack) ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे देशभरामध्ये पडदास उमटत असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या आणि हल्ल्याचा(Pahalgam Terrorist Attack) कट रचणाऱ्या आरोपींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर इशारा दिला आहे. बिहारमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
या दहशतवादी हल्ल्यात(Pahalgam Terrorist Attack) कोणी आपला मुलगा, भाऊ, जीवनसाथी गमावला. यातील कोणी आंध्र, कोणी मराठी, कोणी गुजराती तर कोणी बिहारचा लाल होता. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एकसारखं आहे, आपल्या वेदना एकसारख्या आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
मी खूप स्पष्ट शब्दात सांगतो, ज्यांनी हा हल्ला केलाय. त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा होईल. शिक्षा मिळणारच. दहशतवादांच्या उरल्या सुरल्या जमिनिला संपवण्याची वेळ आलीय, असे यावेळी पंतप्रधान म्हणाले. (Pahalgam Terrorist Attack) हा हल्ला निशस्त्र पर्यटकांवर नव्हता, हा हल्ला भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे.ज्यांनी हे केले त्यांना कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल.दहशतवाद्यांना मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली आहे. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल, असा इशारा त्यांनी जाहीर सभेत बोलताना दिला. आज मी बिहारच्या भूमीवरून संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, जगात कुठेही दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेतला जाईल. शांतीवर विश्वास ठेवणाऱ्यांनी आमच्यात सामील व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या कठोर निर्णयांना कॅट (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) ने पाठिंबा दिला आहे. कॅटने जाहीर केले आहे की आता भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबत कोणताही व्यवसाय करणार नाहीत. 25-26 एप्रिल रोजी भुवनेश्वर येथे होणाऱ्या कॅट बैठकीत हा निर्णय औपचारिकपणे घेतला जाईल. व्यापाऱ्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजूट दाखवली आहे आणि पाकिस्तानशी सर्व प्रकारचे व्यापारी संबंध संपवण्याची मागणी केली आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.