दत्तात्रय सज्जन धर्माबाद दि.२५: शहरात प्रथमच नुकताच ओबीसी समाजातील जमीयतुल मंसूरी पिंजारी मन्सुरी नदाफ समाजाचा तालुका मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी शेकडोच्या संख्येमध्ये समाज बांधव उपस्थित होते.
सदरील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धर्माबाद शहरातील मुस्लिम समाजाचे सर्वेसर्वा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मोईज सेठ करखेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे जिल्हाध्यक्ष निहाल अहमद मंसूरी, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे विश्वासू वर्णी नागभूषणजी गंगना, युवा नेते शंकर अण्णा बोलमवाड, जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर जैनुद्दीन साहब शेख युसुफ साहब रजिस्टर निबंधक कोल्हापूर,एड. जफर पिंजारी, माजी नगरसेवक राजू सुरकुटवार,ताहेर पठाण, धर्माबाद नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती शेख शादुल मौलाना, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मोईजसेठ करखेलीकर यांनी जमीअतुल मंसूरी पिंजारी नदाफ समाज संघटनेच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वोपरी प्रयत्न करू तसेच धर्माबाद तालुक्यातील समाज बांधवांनी एकजुटीने राहून आपला विकास करून घ्यावा असे आवाहन केले आपल्या पाल्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास माझी मदत करण्याची तयारी असल्याचे या ठिकाणी जाहीर केले
मुख्य अतिथी म्हणून बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष निहाल अहमद मंसूरी यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारे आरक्षणासाठी लढावे लागत नसून आपण जन्मजातच ओबीसी समाजामध्ये मोडत असल्यामुळे शासनाने आणलेल्या सर्व योजनांचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा असे या ठिकाणी आव्हान केले यासाठी संघटना म्हणून कोणत्याही प्रकारची कायदेशीर व मार्गदर्शन हवं असल्यास संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचे या ठिकाणी सांगितले.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर जैनुद्दीन साहेब यांनी पिंजारी मन्सुरी नदाफ संघटनेचा पूर्व इतिहास या ठिकाणी समाज बांधवांना समोर सविस्तरपणे मांडणी केली आणि संघटनेसाठी वेळ देऊन संघटना मजबूत करण्याचं या ठिकाणी आव्हान केले
या कार्यक्रमांमध्ये पिंजारी मन्सुरी नदाफ तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून शेख निजाम पिंजारी चिकने कर व धर्माबाद शहराध्यक्ष म्हणून शेख उस्मान पिंजारी यांची निवड करण्यात आली याबरोबरच इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले
यावेळी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून पदाधिकारी ची उपस्थिती होती यामध्ये मुस्तफा भाई पोलीस भोकर,चांदभाई पिंजारी ताजनगर,बशीर पिंजारी राजुरा, गौसभाई पिंजारी रामतीर्थ,मैनूदिन वन्नाली, डॉक्टर सैलानी वनाली, अहेमद पिंजारी बारुल, जमीरभाई पिंजारी अध्येक्ष देगलूर,जावेद सर पिंजारी देगलूर, महेबूब सर पिंजारी करडखेड,यासिन पिंजारी अर्धापूर,अमजद भाई उपाध्येक्ष देगलूर, इस्माईल पिंजारी पत्रकार हदगाव, फारुख भाई पिंजारी पत्रकार हदगाव, लालमद पिंजारी केरूर, सलीम भाई कव्वाल कारला (बु.)
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्माबाद तालुका व शहरातील संघटनेच्या जेष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड