Earthquake : पालघरमध्ये (Palghar) भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्याची घटना घडली आहे. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलं आहे. मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेले भूकंपाचे हादरे पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 2018 पासून पालघरमध्ये सतत भूकंपाचे लहान-मोठे हादरे बसत आहेत.
पालघरमध्ये अचानक भूकंपाचे धक्के
पालघरमध्ये (Palghar) अचानक भूकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली आहे. संध्याकाही ही घटना घडली आहे. यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरलं आहे. गेल्या काही दिवसापासून पालघर परिसरात भूकंपाचे हादरे बंद होते. मात्र, आता पुन्हा भुकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत.
दररोज जगभरात कुठे ना कुठे भूकंपाचे धक्के जाणवतायेत
आता दररोज जगभरात कुठे ना कुठे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. भूकंपाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने लोक घाबरले आहेत. भूकंपाच्या घटना अचानक कशा वाढल्या आणि इतके हादरे का बसत आहेत? हे धोक्याचे संकेत आहेत की आणखी काही? असे प्रश्न पडत आहेत. पृथ्वीचा बाह्य स्तर सुमारे 15 प्रमुख स्लॅबमध्ये विभागलेला आहे. ज्यांना टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांच्या सापेक्ष खूप हळू हलतात. या प्लेट्स सहसा दरवर्षी सेंटीमीटरने हलतात. या प्लेट्स हलताना एकमेकांवर आदळतात तेव्हा भूकंप होतात. संशोधनात असे दिसून आले आहे की बहुतेक भूकंप टेक्टोनिक प्लेटच्या सीमांशी संबंधित असतात. कॉमकॅटच्या भूकंप कॅटलॉगमध्ये अलिकडच्या वर्षांत भूकंपांच्या वाढत्या संख्येचा समावेश आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की भूकंप वाढले याचा अर्थ भूकंपांची संख्या वाढली असा नाही.
कारण हे भूकंप पूर्वी देखील होत असत परंतु आता ते मोजण्यासाठी इतकी साधने उपलब्ध नव्हती. आता अधिकाधिक भूकंप मापन यंत्रे उपलब्ध आहेत जी सर्व तीव्रतेचे भूकंप मोजण्यास सक्षम आहेत. दळणवळणातील सुधारणांमुळे आणि नैसर्गिक आपत्तींबद्दलची आवड वाढल्यामुळे, लोकांना आता भूकंपांबद्दल पूर्वीपेक्षा अधिक जलद माहिती आहे. म्यानमार, नेपाल, पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंप, भारतातही काही ठिकाणी सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या घटनांमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.