नांदेड दि.०१: नांदेड पोलीस दल हे दिनांक 02 जानेवारी पोलीस स्थापना दिवस (Raising Day) साजरा करणार आहे. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 02 जानेवारी, 2024 ते दिनांक 08 जानेवारी, 2024 या दरम्यान नांदेड पोलीस दला तर्फे जिल्हयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 02 जानेवारी, 07.00 ते 08.00 वा. चे दरम्यान दौडचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर दौड मध्ये पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पोलीस मित्र, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी भाग घेतील, पोलीस बँड पथक वजिराबाद व इतवारा हध्दी प्रदर्शन करतील. 03 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरीकांची बैठक पोलीस अधिक्षक कार्यालयात घेवुन त्यांच्या सर्व समस्या एकुण त्या सोडविणे. सदर बैठक महिला सहाय्य कक्ष यांचे वतीने घेण्यात येईल. तसेच पोलीस बँड पथक भोकर येथे प्रदर्शन सादर करतील. दिनांक 04 जानेवारी, शाळा / महाविद्यायास भेटी देवुन महीला सुरक्षा विषयी माहिती देतील. शाळा/महाविद्यालयात मुला मुलींच्या अडचणी समजुन घेतील. तसेव पोस्टे भाग्यनगर, विमानतळ हद्दीतील मुख्य चौकात बँड पथक आपले प्रदर्शन सादर करील. दिनांक 05 जानेवारी, पोलीस स्टेशन मधील मौल्यवान मुद्देमालाची जास्त प्रमाणात निर्गती करून तो मा. कोर्टाचे आदेशा नुसार कारवाई करतील. तसेच परेड, व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शस्त्रप्रदर्शन, डॉग शो, दाखवण्यात येईल. तसेच पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण हध्दीतील मुख्य चौकात बँड पथक आपले प्रदर्शन सादर करील. दिनांक 06 जोनवारी, रोजी पत्रकार दिनांच्या अनुषंगाने पत्रकारांची बैठक मा. जिल्हाधिकारी नियोजन भवन नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच चहापान फराळांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. मा. जिल्हाधिकारी कार्यालयात 16.00 ते 18.00 वा. चे दरम्यान बँड पथक आपले प्रदर्शन सादर करील, दिनांक 07 जानेवारी रोजी अर्धापुर हध्दीतील मुख्य चौकात बँड पथक आपले प्रदर्शन सादर करील. दिनांक 08 जानेवारी, रोजी शाळा / महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे करीता निबंध स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेतील व पोस्टे लोहा येथे मुख्य चौकात बैंड प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता होईल.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड