सोमवार २७ जानेवारी रोजी रंगणार भव्य हवन यज्ञानी
नांदेड दि.२२: भारतीय संस्कृतीमध्ये अनादि काळापासून व्रत्त, वैकल्य, उपासना यांना अनन्य साधारण महत्व आहे. व केलेल्या व्रत वैकल्याचे विधीवतपणे उद्यापन केल्याने त्या व्रताचे योग्य ते फळ प्राप्त होते. त्याबद्दल सोमवार, शिवरात्र, प्रदोष या त्रिवेणी संगमाला विशेष महत्त्व सांगितले आहे. श्री. ष. ब्र.१०८ सोमलिंग शिवाचार्य महास्वामीजी, बिचकुंदा (तेलंगणा) यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या कृपा आशिर्वादाने तथा श्री शिवयोगी मन्ना महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने शके १९४६ पौष कृष्णपक्ष त्रयोदशी दि. २७ जानेवारी सोमवारी सायंकाळी ४ ते ६.३० या प्रदोष काली या शुभ मुहुर्तावर स्थापित श्री हरी हरेश्वर महादेवांच्या सानिध्यामध्ये स्थापित मंडळांच्या पुजनानी हवनच्या यज्ञानी उद्यापन सोहळा हायटेक सिटी, संकेत हॉस्टेल ते आसना चौक रोड, सांगवी (बु), नांदेड.येथे संपन्न होणार आहे.
जास्तीत जास्त शिवभक्त मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे असे आवाहन हायटेक सिटी येथील शिवमंदीराचे मुख्य पुजारी तथा आयोजक श्री वे.मु.एकनाथ महाराज भायेगांवकर यांनी केले आहे ..
या भव्य सोहळ्यासाठी विशेष सहकार्य हे श्री दिनेशकुमार धुत व सर्व हायटेक सिटी परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड